Share

शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा मी निषेध करते- ममता बॅनर्जी

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही ट्वीट करत निषेध केला आहे.

“भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा मी निषेध करते. आणि दोषींवर कठोर कारवाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाचे मी स्वागत करते.”, असे ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. दरम्यान या घटनेनंतर राज्यातूनच नव्हे तर देशातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांनी मविआ सरकारने मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे, अशी मागणी केली आहे. “कालचा ‘सिल्व्हर ओक’ भाग त्यांनी स्क्रिप्ट केलेला नव्हता यावर लोकांनी विश्वास ठेवावा असे जर MVA ला वाटत असेल तर त्यांनी मुंबईच्या सीपींना लवकरात लवकर राजीनामा देण्यास सांगावे. कारण ते एक मोठे गुप्तचर अपयश आहे. नाहीतर ती एक चांगली स्क्रिप्ट केलेली कथा होती दुसरे काही नाही!”, असा टोला नितेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: पंजाबच्या पराभवानंतर सेहवागचा मयंकला खास सल्ला; म्हणाला ‘तू कॅप्टन आहेस हे विसरून जा…’

मुस्लिम समाजाच्या मोर्चामुळे वसंत मोरेंना प्रचंड वेदना

“…तर त्यांनी मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नितेश राणेंची मागणी

IPL 2022: सर जडेजाची चेन्नई सुपर किंग्ज कुल विल्यमसनच्या हैदराबादला भिडणार; जाणून घ्या कोणाचे असेल वर्चस्व

“सरकारने एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी सुडाची कारवाई…”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!