Share

National Family Health Survey | देशातील महिलांचे सेक्स पार्टनर पुरुषांपेक्षाही अधिक, मात्र पुरुष…; वाचा काय आहे हा अहवाल

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : भारतामधील तब्बल ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलांचे पुरुषांपेक्षा अधिक सेक्स पार्टनर असल्याची माहिती एका सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे. केंद्र सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. या सर्वेक्षणानातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशातील ११ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील महिलांचे अधिक सेक्स पार्टनर्स आहेत. मात्र तरीही आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांशी शारीरिक संबंध ठेवण्यात पुरुष महिलांपेक्षा पुढे आहेत.

या सर्वेक्षणात एक लाख पुरुष आणि एक लाख दहा हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे. जोडीदाराशिवाय इतर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचे प्रमाण हे तब्बल ४ टक्के असून अशा महिलांचं प्रमाण हे केवळ अर्धा टक्का आहे. पत्नी किंवा ज्या व्यक्तीबरोबर एकत्र किंवा लिव्हइनमध्ये राहत नाही, अशा व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्यात या राज्यांमधले पुरुष हे महिलांच्या तुलनेत आघाडीवर आहेत. १२ महिन्याच्या कालावधीत जोडीदाराव्यतिरिक्त इतर महिलांशी लैंगिक संबंधठे वणाऱ्या पुरुषांची टक्केवारी ४ असून महिलांची टक्केवारी केवळ अर्धा टक्का इतकी आहे.

कोणती आहेत ही राज्य?
जम्मू आणि काश्मीर, लडाख, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि लक्षद्विप या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा यात समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यात सर्वात आघाडीवर राजस्थानमधील महिला आहेत. येथे प्रत्येक पुरुषांच्या महिला जोडीदारांच्या संख्येची सरासरी १.८ इतकी असून या तुलनेत महिलांच्या सेक्स पार्टनरची सरासरी ३.१ इतकी म्हणजेच सर्वाधिक आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!