Share

Shivaji Adhalrao Patil : शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेनेतच, प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती अनावधानाने प्रसिद्ध झाली अशी कबुली शिवसेनेकडून देण्यात आली आहे. आढळराव पाटील हे शिवसेनेतच कार्यरत आहेत असेही सांगण्यात आले आहे. शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी केल्याने यामध्ये शिवसेनेचे मोठे नुकसान मानले जात होते परंतु आता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लिहिले आहे की, ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आलेली असून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

शिवसेना पक्षातील महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात बऱ्याच अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर दोन दिवसांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विविध स्तरावरतून मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यादरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही सोशल मीडियाद्वारे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे या पोस्टमध्ये कुठेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो किंवा नावाचा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिवसेनेने कारवाई केले असे सांगितले जात होते. मात्र आता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आढळराव पाटील हे शिवसेनेतच असल्याचे मान्य केले आहे.

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला बळकट करण्यात आढळराव पाटलांचा मोठा वाटा राहिला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना पक्षातील मोठे नेते मानले जातात. त्यांनी २००४ मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर २००० आणि २०१४ लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी १५ वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता. या पराभवानंतर आढळराव पाटलांचे नाव हे मोठ्या प्रमाणात झाकले गेले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!