Share

Amol Mitkari : बंडखोरांना पक्षाचा अधिकृत व्हीप पाळावाच लागेल – अमोल मिटकरी

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर आपल्या सहकारी आमदारांसोबत भाजपशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केले आहे. भाजप व शिंदे गटाकडे बहुमताचा आकडा असल्यामुळे त्यांचाच उमेदवार या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय ठरेल असा त्यांना विश्वास आहे. गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेचे अध्यक्षपदी रिकामेच आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल यांच्यातील वादामुळे हे पद रिक्तच राहिले आहे. त्यानंतर आता या पदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे नेते राजन साळवी हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता शेवटी विधानसभेला अध्यक्ष मिळणार आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व शिवसेना यांनी दोघांनीही एकमेकांना व्हीप जारी केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पोस्ट शेअर केली आहे.

“बंडखोरांना” पक्षाचा अधिकृत व्हीप पाळावाच लागेल ,नाहीतर आमदारकी रद्द होण्याचा धोका पत्करावा लागेल. त्यातुनही कुट नितीने पलायन केले तर उद्यापासुन मतदारसंघातली जनता स्वागतासाठी उत्सुक आहेच. असे अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी राजन साळवी यांना मतदान करण्याच्या आदेशाचा व्हीप जारी केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील भरत गोगावले यांनी भाजपचे राहुल नार्वेकरांना मतदान करण्याच्या आदेशाचा व्हीप जारी केला आहे. यादरम्यान शिवसेनेचा विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आल्याने मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.

पक्षांकडून जारी केला जाणारा व्हीप म्हणजे नेमकं काय?
प्रत्येक पक्षाचा व्हीप हा त्या त्या पक्षांतील आमदारांसाठी पाळणे बंधनकारक असतो. पक्षातील एखाद्या आमदाराने या व्हीपचे उल्लंघन केल्यास किंवा मतदानास गैरहजर राहिल्यास संबंधित आमदारावर अपात्रतेची कारवाई केली जाते. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता असते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!