🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार राज्यात कोसळलं आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आधीच्या सरकारच्या निर्णयांना बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे का? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. कारण नव्याने आलेल्या या सरकारनं कालच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेट्रो कारशेडचा निर्णय बदलला आहे. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सत्तेची धुरा स्वतःच्या हातामध्ये घेत शिंदे-फडणवीस सरकारने ॲक्शन मोडमध्ये येत कामांना वेगाने सुरुवात केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या ५६७ कोटी रुपयांच्या कामांना या सरकारने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही निर्णय घाईत घेतले असल्याचं कारण देत शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतलाय.
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना या विषयावरून एकनाथ शिंदे यांनी चांगलंच फैलावर घेतलेलं आहे. घाईत कार्य समितीची बैठक घेऊन या कामांना मंजुरी का दिली? असा सवाल शिंदेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
५६७ कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देणे हा निर्णय माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का मानला जात आहे. सुरुवातीला आरे संदर्भातील निर्णय बदलून पहिला धक्का दिला. या धक्क्यातून सावरत असतानाच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. आणि आता जवळपास ५६७ कोटींची कामं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅक्शन , मोडमध्ये आलेल हे शिंदे फडणवीस सरकार आता यानंतर कोणता निर्णय घेणार आणि कुणाला धक्का देणारं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
