🕒 1 min read
मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाकडे लागलेले आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना २७ जुलै रोजी कोरोना झाला होता. त्यांचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे ते आज होणाऱ्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होतील अशी शक्यता आहे. मागील महिनाभरापासून महाराष्ट्रातील राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अशातच आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे नेते राजन साळवी हे रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे नेते आणि एकनाथ शिंदे गटातील आमदार यांच्यामध्ये खटके उडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंड केल्यामुळे विधान भवनातील शिवसेना विधिमंडळ कार्यालय बंद करण्यात आले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्ष यांच्या सूचनेवरून हे कार्यालय बंद केली असल्याची दरवाजावर नोटीस लावण्यात आली आहे. या कार्यालयात काम करणारे पदाधिकारी व इतर कर्मचारी बाहेर असल्याचे पाहायला मिळत आहे.
अजित पवार आजच्या विधानसभेतील कामकाजासाठी हजर राहतील
२७ जुलैला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याने ते आज होणाऱ्या विधानसभेतील कामकाजासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पक्षांकडून जारी केला जाणारा व्हीप म्हणजे नेमकं काय?
प्रत्येक पक्षाचा व्हीप हा त्या त्या पक्षांतील आमदारांसाठी पाळणे बंधनकारक असतो. पक्षातील एखाद्या आमदाराने या व्हीपचे उल्लंघन केल्यास किंवा मतदानास गैरहजर राहिल्यास संबंधित आमदारावर अपात्रतेची कारवाई केली जाते. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता असते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
