मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात शिंदे गट विरुद्ध शिवसेना असाच संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटात सामील झालेले सर्वच आमदार सुरुवातीला उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या बाबत आदराची भावना व्यक्त करत होते. मात्र आता त्यांनी हळूहळू उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी थेट कार्यालयातूनच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो पाठवले आहेत. यांच्या जागी शिरसाठ यांनी आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावले आहेत. शिरसाठ यांच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
संजय शिरसाठ यांनी आपल्या कार्यालयातून पक्षप्रमुखांचा व आदित्य ठाकरे यांचा फोटो हटवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर आता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिरसाट म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांचा फोटो माझ्या कार्यालयात नव्हता. उद्धव ठाकरेंचा फोटो जरूर होता. माझ्या कार्यालयात नेहमी एकच फोटो असतो. तुम्ही कार्यालयात पाहिलं तर तुम्हाला माझाही फोटो कुठे दिसणार नाही. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात असणं अत्यावश्यक आहे.” असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतही वक्तव्य केले. “आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून तुम्ही रोजच आमची हेटाळणी करत असाल तर, आम्ही त्यांच्या फोटोकडे पाहून काय समजायचं? अरे हे… आम्हाला गद्दार म्हणतात, हे आम्हाला बंडखोर म्हणतात, हे आम्हाला विकलेले म्हणतात, असं सगळं पाहून आम्ही त्यांना अपेक्षित धरायचं का?” असा सवालही यावेळी शिरसाठ यांनी केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे ज्या दिवशी आम्हाला चांगलं बोलतील त्या दिवशी त्यांचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला जाईल अशीही भावना शिरसाठ यांनी यावेळी व्यक्त केली.
“शिवसेना पक्षप्रमुख हे आमच्या कायम हृदयात आहेत. त्यामुळे त्यांच्या फोटोचा प्रश्न उपस्थित व्हायचा विषय नाही. त्यामुळे तुम्ही कार्यालयात प्रवेश करतात तुम्हाला त्यांचा फोटो दिसेल आणि तो तिथून कधी हलणारही नाही. कारण त्या शिवसेना पक्षप्रमुखांनीच आम्हाला मोठं केलं आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आज या ठिकाणी पोहोचलो आहोत.” असेही शिरसाट यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit pawar | उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यात राहणार विरोधी पक्षनेते अजित पवार
- Rohit Pawar : अनियंत्रित सत्तेला वेसण घातली जाईल का? ; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर रोहित पवारांचे सुचक ट्वीट
- Supreme Court Hearing : आज शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार! सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष
- Uday Samant : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करू नये – नीलम गोऱ्हे
- CM Eknath Shinde : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!


