पुणे : पुण्यातील कात्रज येथे एकनाथ शिंदे गटातील आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आता शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावरील हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. असे त्यांनी म्हटले आहे.
“पुण्यात काल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कात्रज याठिकाणी सभा झाली. याच ठिकाणावरून माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनांचा ताफा जात असताना हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दिसून येत आहे. बऱ्याच वाहिन्यावर चित्रीकरण प्रसरितही झाले आहे. या सगळ्या घटनेमध्ये पूर्णपणे मी स्पष्ट करू इच्छिते की, हे जे हल्ला करणारे लोक आहेत यांना शिवसैनिक म्हणून गृहीत धरणे योग्य नाही. जोपर्यंत या सर्व घटनेबाबत सविस्तर माहिती समोर येत नाही तोपर्यंत शिवसेनेला बदनाम करू नये.” असे त्या म्हणाल्या आहेत.
“आमच्या सभेमध्ये आदित्य साहेबांनी जे भाषण केलं, तसेच आमची जी भाषणे झाली ती संपूर्णपणे लोकशाहीच्या चौकटीतलेच विचार मांडलेले होते. उलट ज्यांना शिवसेनेची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होते. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गाडी फोडण्याच्या घटनेशी या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी.” असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
While supporters of rebal MLA #UdaySamant alleges the attack on his car at #Pune was by #ShivSena men, party leader Smt. Neelam Gorhe raises questions over the claims.
Interesting though! Then who is doing this? Any forces specially on the job?
What's in store for #Maharashtra ?— Ravikiran Deshmukh (@RavikiranRKD) August 3, 2022
उदय सामंत यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली असून १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर उदय सामंत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवसैनिकांवरील या कारवाईमध्ये पुण्यातील मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली. मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रूपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!
- Uday Samant : शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष पेटला, उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी ५ जणांना अटक!
- CWG 2022 : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वातील बॅडमिंटन संघाने जिंकले ‘सिल्वर मेडल’; वाचा सविस्तर!
- VIDEO – माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला
- BREAKING : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, पुण्यात मोठा गदारोळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

