मुंबई : काल पुण्यात एकनाथ शिंदे गट विरुध्द उध्दव ठाकरे गट यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान कात्रज येथे उदय सामंत यांच्याविरुद्ध शिवसैनिकांकडून गद्दार..गद्दार अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्याचे समोर आले आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
“उदय सामंत यांच्या वाहनावर भ्याड हल्ला झाला आहे. त्यामुळे ही मर्दुमकी नाही. कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर, पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहे. आरोपींवर कारवाई करण्याचे काम पोलीस करत आहेत. गुन्हा घडल्यावर पोलिसांना सांगावे लागत नाही की तुम्ही गुन्हा दाखल करा. त्याचबरोबर कोणी चिथावणी खोर भाषण करत असतील तर त्यावरही पोलीस कारवाई करतील. कायदा सुव्यवस्था पोलीस पाहण्याचे काम करत आहेत. मला राज्यात शांतता हवी आहे.”अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
Pune | This attack is a cowardly act. It is our responsibility to maintain law and order. If anyone tries to disturb the law and order, then strict action will be taken. Everyone should maintain peace: Maharashtra CM Eknath Shinde on attack on Uday Samant's car (02.08) https://t.co/9hurajnVYz pic.twitter.com/vIHTlrsPyQ
— ANI (@ANI) August 2, 2022
उदय सामंत यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली असून १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर उदय सामंत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवसैनिकांवरील या कारवाईमध्ये पुण्यातील मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली. मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रूपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant : शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष पेटला, उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी ५ जणांना अटक!
- CWG 2022 : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वातील बॅडमिंटन संघाने जिंकले ‘सिल्वर मेडल’; वाचा सविस्तर!
- VIDEO – माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला
- BREAKING : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, पुण्यात मोठा गदारोळ
- Partha Chatterjee SSC scam | पार्थ चॅटर्जीवर एका महिलेने फेकली चप्पल; म्हणाली, भ्रष्टाचारी माणसाला एसी गाडीतून का आणता?


