जळगाव : शिवसेना कुणाची यावरुन जो येतो तो आमच्यावर बोलतो. पण शिवसेना आमचीच आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही काय कमळावर विजयी झालो का? असा सवाल उपस्थित करत ज्यांच्यासोबत आमचं २५ वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलं, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत! या शब्दात इतिहास लिहिला जाईल. असंही पाटील म्हणालेत.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असं केलं असतं तर सरकार वाचू शकलं असतं. मात्र त्यावेळी त्यांच्याकडून उडाले ते कावळे राहिले ते मावळे अशी भाषा वापरण्यात आली. राऊत यांना आवरा असं म्हणत चहा पेक्षा किटली गरम अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. ते म्हणाले, 35 वर्ष एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आम्ही आणि आमच्यावर टीका करतात. या टीका करणाऱ्यांची लाज वाटते. कोण संजय राऊत? आमदाराने मत दिली म्हणून ते खासदार झाले”. असं म्हणत पाटील यांनी राऊतांवरही टीका केली.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “मुख्यमंत्री होण्याचं अजित पवारांचं स्वप्न होतं पण…”; म्हणत शिंदे गटाचा अजित पवारांवर हल्ला
- Ganeshotsav 2022 | अमित शहांनी घेतले मुंबई येथील लालबागच्या राजाचे दर्शन
- Ashish Shelar | ‘सडक्या मेंदूचे’ म्हणणाऱ्या शिवसेनेवर आशिष शेलार यांचा पलटवार म्हणाले…
- Ambadas Danave | अमित शहांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवलं – अंबादास दानवे
- Gopichand Padalkar | “शरद पवार साहेबच राज्यात राजकीय बदल करू शकतात…”, गोपीचंद पडळकर यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

