🕒 1 min read
मुंबई : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव करून भारताने ३ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने दुसरा एकदिवसीय सामना तर जिंकलाच, पण मालिकाही खिशात घातली. वेस्ट इंडीजवर भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय ठरला आहे. भारताने या सामन्यात विक्रमी कामगिरी केल्यामुळे खेळाडूंचा जल्लोष साजरा करणे नक्की होते. याचा एक व्हिडिओ कर्णधार शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू पूर्ण जोमात दिसत आहेत.
कर्णधार शिखर धवनने हा व्हिडीओ शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले की, ‘टॅलेंट तुम्हाला सामने जिंकायला मदत करते. पण, टीमवर्क आणि प्रतिभा हे तुम्हाला मालिका जिंकण्यास मदत करतात. समोरा-समोरच्या लढाईत अप्रतिम सांघिक कामगिरी! या सामन्यात दबंगला विशेष कामगिरी करता आली नाही आणि तो १३ धावांवर बाद झाला होता. पण, कर्णधार म्हणून त्याला संस्मरणीय विजय मिळाला. धवनने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९७ धावांची इनिंग खेळली होती.
काल खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम खेळताना यजमानांनी शाई होपचे शतक आणि कर्णधार निकोस पूरनच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद ३११ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. दुसऱ्या डावात भारताकडून श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतके झळकावली. शेवटी अक्षर पटेलच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ४९.४ षटकात ८ विकेट गमावत ३१२ धावा करत सामना जिंकला. सामन्यातील अक्षर पटेलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ‘सामनावीर’ चा किताब देण्यात आला.
https://www.instagram.com/reel/CgarsEVhYN0/?igshid=YmMyMTA2M2Y=
पाकिस्तानला टाकले मागे
पाकिस्तानने १९९६ ते २०२१ पर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ वनडे मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. परंतु आता भारतीय संघाने पाकिस्तानला मागे सोडत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सलग १२ एके दिवशी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारताने या संघाविरुद्ध २००७ पासून एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. तर पाकिस्तान संघाने १९९६ पासून झिंबाब्वे संघाविरुद्ध सलग ११ एकदिवसीय मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad : राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसतं – जितेंद्र आव्हाड
- Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव
- President Draupadi Murmu | “अमृत महोत्सवी वर्षात ही जबाबदारी मिळणं माझ्यासाठी सौभाग्यच”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ
- Uddhav Thackeray : “काल एका पक्षानं शिंदे गटाला ऑफर दिलीय, पण…”; राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
