मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या धनुष्यबान या चिन्हासाठी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना आपापले कागदी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ८ ऑगस्टपर्यंत दोन्ही गटांना आपापले मत मांडण्यासाठी मुदत दिलेली आहे. मात्र आता शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंनी आता निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधातच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये अगोदरचेच काही निर्णय न्यायालयात प्रलंबित असताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशाच्या नोटिसीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्याची विनंती याचिका शिवसेनेकडून दाखल केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात आज शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केले जाईल अशी माहिती आहे.
शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण नेमकं कोणाकडे राहणार याबाबत प्रश्न उपस्थित होते. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावर ताबा मिळवण्यासाठी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिवसेनेकडून आता निवडणूक आयोगाच्या या नोटिशीला स्थगिती देण्याची विनंती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जाणार आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील बऱ्याच आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर शिंदे यांनी राज्यात भाजप सोबत जात सरकार स्थापन केले. या सगळ्या घडामोडीतील राजकीय संघर्ष आता शिवसेनेच्या धनुष्यबाणावर येऊन पोहोचला आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात धनुष्यबाणासाठी संघर्ष सुरू झाला आहे. याबाबतीत निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपापल्या बाजू मांडण्यासाठी कागदी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडून दोन्ही बाजूंना आपलं म्हणणं मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : “काल एका पक्षानं शिंदे गटाला ऑफर दिलीय, पण…”; राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे
- IND vs WI : वेस्टइंडीजवर मात करत भारताने रचला ‘हा’ विश्वविक्रम, पाकिस्तानला टाकले मागे; वाचा!
- Paymate B2B ग्राहकांना व्हिसा कमर्शियल क्रेडिट कार्डद्वारे सुविधा देयके भरणे शक्य
- Anil Desai : धनुष्यबाण मिळविण्याच्या लढाईत आता अनिल देसाईंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…


