Uddhav Thackeray । मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि पक्षातील तब्बल ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंनी संख्याबळ दाखवत जरी सत्ता स्थापन केली असली, तरी ती कायद्याच्या चौकटीत टिकेल का हा मात्र अजूनही प्रश्नच आहे. सरकार शाबूत ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असा दावा करण्यात येत आहे. असे असताना शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यानंतर राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचाचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
काल मुंबईत शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रामात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, आज शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. आज जे कायदातज्ज्ञ सांगत आहेत. आधी दोन-तृतीयांश बहुमताचा नियम होता. पण आता तो राहिलेला नाही. जे फुटलेले आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याखेरीच पर्याय नाही. कालच एका पक्षानं त्यांना ऑफर दिली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर शिवसैनिकांनी ‘केमिकल लोचा’ अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आता किती जणांचा केमिकल लोचा झाला असेल ते सांगता येत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?
शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय व पक्षाच्या नेतृत्वाबाबत राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी याबाबत स्पष्टपणे मत व्यक्त केले. “मी पक्षातून बाहेर पडण्या अगोदर बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यांना कायम एकच विचारत होतो की माझा पक्षामध्ये जॉब काय आहे? मला फक्त प्रचारामध्ये भाषण करण्यासाठी वापरणार असाल, तर मी दुसऱ्यांसाठी माझा शब्द देऊ शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी मंगेश चिवटे
- IND vs WI : वेस्टइंडीजवर मात करत भारताने रचला ‘हा’ विश्वविक्रम, पाकिस्तानला टाकले मागे; वाचा!
- Paymate B2B ग्राहकांना व्हिसा कमर्शियल क्रेडिट कार्डद्वारे सुविधा देयके भरणे शक्य
- Anil Desai : धनुष्यबाण मिळविण्याच्या लढाईत आता अनिल देसाईंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Uddhav Thackeray : “भाजपाला एक तर शिवसेना संपवायचीय आणि ती संपवताना त्यांना ठाकरे…” ; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप


