Share

President Draupadi Murmu | “अमृत महोत्सवी वर्षात ही जबाबदारी मिळणं माझ्यासाठी सौभाग्यच”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आज द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी त्यांना शपथ दिली. द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधीत केले. “या वर्षी आपला देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करणार आहे. हा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. त्यामुळे मला वाटतं अत्यंत महत्त्वाच्या काळात माझी राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. या काळात मला ही जबाबदारी मिळणं म्हणजे माझं सौभाग्यच आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आपल्या भाषणात पुढे बोलताना त्या असेही म्हणाल्या कि, “स्वातंत्र्य सैनिकांनी भविष्याकडून ज्या आशा ठेवल्या होत्या. त्यासाठी काम करावं लागेल. सर्वांचे एकत्रित प्रयत्न आणि कर्तव्य या मार्गाने आपल्याला पुढे जावं लागेल. देशाचं उज्ज्वल भविष्य हे सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नांमुळेच शक्य होईल. देशवासियांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असेल.” यांनतर त्यांनी उद्या असेलेल्या कारगील दिवसाच्या जनतेला आणि देशाच्या सेनांना शुभेच्छा दिल्या.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा
“स्वातंत्र्यानंतर जन्मलेली मी पहिलीच राष्ट्रपती आहे. ओडिसाच्या एका छोट्याश्या आदिवासी गावातून मी कामाची सुरुवात केली होती. मी ज्या भागात जन्म घेतला तिथे प्राथमिक शिक्षण मिळणं देखील सहज सोपं नव्हत. तरी देखील मी शिक्षण घेतलं. महाविद्यालयात जाणारी मी माझ्या समाजातील पहिलीच मुलगी होते. माझ्या परिसरातील आमदाराच्या सांगण्यावरून मी राजकारणात आले आणि नगरसेवकपदापासून माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली”, असे म्हणत त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!