Share

नातेवाईकांच्या प्रश्नावरून शरद पवार संतापले, पत्रकाराला निघून जाण्याची केली विनंती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप – सेनेत प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजप – सेनेच्या वाटेवर आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ढेपाळला आहे. शरद पवारांच्या विश्वासातल्या नेत्यांनी पक्षाला राम राम केलाचं आहे, पण आता नातेवाईक ही पक्षांतर करत आहे. याच संदर्भात श्रीरामपुरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. पवारांनी पत्रकारावर संताप व्यक्त केला आणि पत्रकार परिषदेतून जाण्याची विनंती केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. नेत्यांबरोबर नातेवाईक ही पक्षांतर करत आहेत, असा प्रश्न विचारला असता. शरद पवार संतापले. इथे नातेवाईकांचा काय संबंध आला असा प्रश्न विचारला. असे असभ्य प्रश्न विचारल्या बद्दल तुम्ही माफी मागा अशी मागणी शरद पवार यांनी केली. एक तर पत्रकार परिषदेला मला तरी बोलावत जाऊ नका अन्यथा अशा पत्रकारांना देखील बोलावू नका, असे पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान शरद पवार यांनी पक्षांतरावर बोलताना पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र नातेवाईकांच्या पक्षांतरा बाबत विचारले असता. शरद पवार संतापले. वास्तवात माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हेदेखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षा नंतर आता घरला देखील गळती लागली असल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!