Share

मी केस फिल्टरच्या पाण्याने धुतले म्हणून वाचलो, बबनराव लोणीकरांचा अजब दावा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी परभणी (सेलू) येथे पोहोचली. या यात्रेत भाजप नेत्यांनी विरोधकांना चांगलीच टोलेबाजी केली. तर भाजप नेते आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या भाषणामुळे परभणीतील महाजनादेश यात्रा चांगलीच गाजली. लोणीकर यांच्या एका अजब दाव्यानी उपस्थितीतांना अचंबितचं केले.

पुर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठवाड्याला नदीचं, ओढ्या, डबक्याचं, दुषित बोरच पाणी पाजलं. आमच्या मराठवाड्याला आधीच्या सरकारने शाहू, फुले, आंबेडकरांच नाव सांगितले. परंतु, आम्हाला केवळ दुषित पाणीपुरवठा केला. या दुषित पाणीपुरवठ्यामुळे गरिब लोकांच्या किडन्या खराब झाल्या, लिव्हर, वॉल्व्हस खराब झाले. याच पाण्यामुळे येथे उपस्थित अर्ध्या लोकांच्या डोक्यावरचे केस गेले. पण मी वाचलो मी माझे केस फिल्टरच्या पाण्याने धुतले. त्यामुळे माझे केस सुरक्षीत असल्याचा अजब दावा लोणीकर यांनी केला.

दरम्यान मराठवाडा याही वर्षी दुष्काळात आहे. पाण्याअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मराठवाड्याचे राजकारण हे पाण्याभोवती फिरत असल्याच दिसत आहे. कारण विरोधकांनी देखील सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत पाण्याच्या उपाययोजनेबाबत सवाल विचारले आहेत. तर आता सत्ताधारी पक्षांनी देखील मराठवाड्याला पाण्यापासून वंचित इथून मागच्या सरकारने ठेवल्याचा अजब दावा केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!