टीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेश कॉंग्रेसमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याच सांगितले जात आहे. काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून मध्यप्रदेशमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदावर दावा केला आहे. जर हे पद मिळाल नाही तर ज्योतोरादित्य शिंदे ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच सांगितल जात आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. या भेटीत मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक नावांवर चर्चा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर कमलनाथ यांनी मध्यप्रदेश कॉंग्रेस कमिटीचा राजीनामा दिला होता. अजूनही हे पद रिक्त असल्याने मध्यप्रदेश कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पदावर दावा केला आहे. मात्र त्यातल्या त्यात ज्योतिरादित्य शिंदे हे अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र गटबाजीचे राजकारण झाल्यास आणि अध्यक्षपदावरून डावल्यास शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान गेले काही दिवस ज्योतिरादित्य शिंदे हे भाजप नेत्यांचा संपर्कात आहेत. तर त्यांनी कलम 370 हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे. कलम 370 हटवल्यानंतर त्यांनी कलम 370 हटवण्याच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.
- राज्य सहकारी बँक घोटाळा : तपासासाठी एसआयटीची स्थापना,’हा’ अधिकारी करणार नेतृत्व
- पक्षांतर केलेल्यांचीही ‘ईडी’ चौकशी होऊ शकते : चंद्रकांत पाटील
- कॉंग्रेसमुळेच मी पट्टेवाल्याचा गृहमंत्री झालो : सुशीलकुमार शिंदे
- रोहित पवारांच्या उमेदवारीला गटबाजीचे विघ्न, घोंगावतंंय दुहेरी संकट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

