Share

परभणीची महाजनादेश यात्रा झाली सफल, नगराध्यक्षासह १७ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर परभणीच्या महाजनादेश यात्रेतही देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह सतरा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे परभणीतील स्थानिक राजकारण आता वेगळे वळण घेणार आहे.

पक्षांतरामुळे जिंतूर मतदारसंघाची समीकरणे आता बदलणार असून या मतदारसंघात भाजपाची चांगली ताकद वाढली आहे. या प्रवेशामुळे आमदार विजय भांबळे यांना चांगलाच झटका बसल्याची चर्चा यावेळी होती. सेलु शहरात विनोद बोराडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत विनोद बोराडे यांनी शहर विकास आघाडी स्थापन करत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा चांगलाच परिणाम दिसणार आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी परभणी (सेलू) येथे पोहोचली. या यात्रेत भाजप नेत्यांनी विरोधकांना चांगलीच टोलेबाजी केली. तर भाजप नेते आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या भाषणामुळे परभणीतील महाजनादेश यात्रा चांगलीच गाजली. लोणीकर यांच्या एका अजब दाव्यानी उपस्थितीतांना अचंबितचं केले. अशुद्ध पाण्यामुळे मराठवाड्यातील जनतेची केस गेली. पण मी वाचलो मी माझे केस फिल्टरच्या पाण्याने धुतले. त्यामुळे माझे केस सुरक्षीत असल्याचा अजब दावा लोणीकर यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!