टीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती ठोक मोर्चाने विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर मराठा क्रांती ठोक मोर्चा आता भाजप युतीला पाठींबा देणार आहे. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी मराठा क्रांती ठोक मार्च्याशी बातचीत केली. या चर्चेनंतर मराठा क्रांती ठोक मोर्च्याने निवडणुकीतून माघार घेत भाजप युतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार होते. आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाने केला होता. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नसल्याने विधानसभा निवडणुकीत २५ ते ३० उमेदवार उभे करणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सांगण्यात आलं होत.
मात्र आता विनायक मेटे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मराठा ठोक मोर्च्याची भूमिका बदलली आहे. तर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत भाजप युतीला पाठींबा देणार असल्याच म्हंटल आहे. समाजाचे प्रलंबित प्रश्न भाजप युती सरकार सोडवेल अशी अशा ठोक मोर्च्याला आहे. तर असा विश्वास देखील मेटे यांच्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मराठा ठोक मोर्चा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे.
- परभणीची महाजनादेश यात्रा झाली सफल, नगराध्यक्षासह १७ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
- मी केस फिल्टरच्या पाण्याने धुतले म्हणून वाचलो, बबनराव लोणीकरांचा अजब दावा
- मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेला ‘हा’ कॉंग्रेसचा मातब्बर नेता भाजपच्या वाटेवर
- राज्य सहकारी बँक घोटाळा : तपासासाठी एसआयटीची स्थापना,’हा’ अधिकारी करणार नेतृत्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

