Sanjay Raut । मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मात्र बंडखोरांवर सडकून टीका करत होते. यावेळी संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राज्यातील चालू परिस्थिती लक्षात घेता त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील निशाणा साधलाय. तसेच हे सरकार बेकायदेशीर असल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेला आहे. काहीच सुरू झाला नाही. सध्या राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. लोक मृत्यूमुखी पडत आहेत. सरकार अस्तित्वात नाही. दोघांनी शपथ घेतली म्हणजे सरकार आलं असं नाही. 12 दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात नाही. कारण दोन लोकांचं सरकार हे बेकायदेशीर आहे. आमदार अपात्रं ठरू शकतात. त्यांना शपथ देणं हा राजद्रोह आहे. हे घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजकीय भ्रष्टाचार आहे. त्याची भीती असल्याने त्यांना रोखलं असावं. राज्यपालांनी कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये, असं म्हणत राऊतांनी जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. तर दुसरीकडे कॉलराचं थैमान सुरु आहे. पावसामुळे राज्यभरात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल आम्हाला खूप सल्ला द्यायचे. आता त्यांची गरज आहे. आता त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का? असा संतप्त सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Clyde Crasto : “क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
- Mohan Bhagwat | फक्त खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरे देखील करतात – मोहन भागवत
- Urfi Javed | उर्फी जावेदचा ड्रेस पाहून तुम्हीही व्हाल ‘घायाळ’; नेटकऱ्यांच्या मजेदार कॉमेंट्स
- Sanjay Raut : राज्यात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवाल
- Sanjay Raut : “मातोश्रीवर याव्यात म्हणून…”, संजय राऊतांनी केले मुर्मू यांना पाठींबा देण्यामागील कारण स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

