मुंबई – मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.महाविकास आघाड़ी सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील वाढते निर्घृण अत्याचार, गुन्हेगारांचे वाढते मनोबल तसेच महिलांच्या मनातील वाढती असुरक्षितता याबाबत राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांना अवगत केले.
या बरोबरच या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. यात महाराष्टात शक्ति कायदा लागू केला जावा. महाराष्ट्र सरकारने विशेष विधानसभा सत्र आयोजित करुन शक्ती कायदा लवकरात लवकर पास करावा. मुंबई मधील साकीनाका येथे झालेल्या निर्घृण गुन्ह्यातील बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी दिली जावी. तसेच, भाजपा शासन काळात कार्यान्वित केलेली CCTV कार्यप्रणाली अधिक सृढृढ़ केली जावी अशी मागणी केली आहे.
या महिला शिष्टमंडळात मुंबई भाजपाच्या महिला प्रतिनिधी, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, आमदार भारती लवेकर, शलाका साळवी, मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा शीतल गंभीर, मुंबई भाजपाच्या मिडिया प्रभारी श्वेता परुळकर, मुंबई भाजपा युवती प्रमुख पल्लवी सप्रे यांच्या सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
महत्वाच्या बातम्या :
- मुश्रीफ तुम्ही शंभर काय हजार कोटींचा दावा टाका, पण…; चंद्रकांत पाटलांचे खुले आव्हान
- पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटत नसल्याने चक्क वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले
- भाजपा अपयशी मुख्यमंत्र्यांना बदलण्यात व्यस्त आहे; रुपाणींच्या राजीनाम्यानंतर चिदंबरम यांची टीका
- ‘बलात्काऱ्यांना देहदंडाचीच शिक्षा व्हावी अशी कायद्यात तरतूद करा’, उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
- ‘महिलांवर अत्याचार होऊ नये ही सरकारची भूमिका; भाजपशासित राज्यांमध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचे काम’

