🕒 1 min read
मुंबई: राज्यात अनेक घडामोडीनंतर, शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या सहकार्याने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
“अडीच वर्ष कटकारस्थान केली आणि महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पडले, नंतर त्याग देखील केला आणि मुख्यमंत्रीपद सोडले. एवढे सर्व करून सुद्धा मंत्र्यांची कार्यकारिणी अजून जाहीर झाली नाही. भाजप का गप्प आहे? सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघत आहे का? क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?”, असे ट्वीट करत क्लाईड क्रास्टो यांनी भाजपला तसेच शिंदे सरकारला टोला लगावला आहे.
अडीच वर्ष कटकारस्थान केली आणि महाराष्ट्रातले #MVA सरकार पडले, नंतर त्याग देखील केला आणि मुख्यमंत्रीपद सोडले.
एवढे सर्व करून सुद्धा मंत्र्यांची कार्यकारिणी अजून जाहीर झाली नाही.#भाजपा का गप्प आहे?
सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघत आहे का?"क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?"
— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो ???????? (@Clyde_Crasto) July 14, 2022
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदाची शपथ घेतली आहे. मात्र अजूनही मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे येत्या १९ जुलैरोजी शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार, अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडून मंत्र्यांची लीस्ट तयार असून ती 19 तारखेला जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Mohan Bhagwat | फक्त खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरे देखील करतात – मोहन भागवत
- Urfi Javed | उर्फी जावेदचा ड्रेस पाहून तुम्हीही व्हाल ‘घायाळ’; नेटकऱ्यांच्या मजेदार कॉमेंट्स
- Sanjay Raut : राज्यात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू, कुठे आहेत राज्यपाल?; संजय राऊत यांचा सवाल
- Sanjay Raut : “मातोश्रीवर याव्यात म्हणून…”, संजय राऊतांनी केले मुर्मू यांना पाठींबा देण्यामागील कारण स्पष्ट
- Nitin Gadkari | वाहनांच्या वेगमर्यादेबाबत नवे निर्णय घेणार; नितीन गडकरींची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
