Share

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हा आश्चर्याचा धक्का – शरद पवार

Published On: 

मुंबई : आज महाराष्ट्र राज्याला ३० वे नवे मुख्यमंत्री मिळेल. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या दोघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुरवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होत. मात्र शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झालं. या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले कि, जे आसाममध्ये गेले होते, त्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा जास्त होती असे वाटत नाही. मात्र दिल्ली किंवा नागपूरवरून आदेश आला. यानंतर या आदेशामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली, असं ते म्हणाले.

यानंतर पुढे शिंदेंना मुख्यमंत्री पद भेटणार याची कल्पना त्यांनाही नसावी. दुसरं आश्चर्य हे की, आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो. याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली हा आश्चर्याचा धक्का होता, असंही देखील शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं.

दरम्यान, आजचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोबत आहेत. त्यांच्या साथीने राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीनंतर ठाण्यात शिंदे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष देखील पहायला मिळाला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!