Share

“हर हर ईडी, घर घर ईडी”, सामनातून संजय राऊतांचा प्रहार

Published On: 

मुंबई: कोल्हापूर ‘उत्तर’ पोटनिवडणुकीत चंद्रकांतदादांनी भाजपचे उमेदवार म्हणून स्वतः ‘शड्डू’ ठोकायला हरकत नव्हती. ‘ईडी’च्या नावाने आरोळ्या तेव्हाही ठोकता आल्या असत्या, पण तसे का झाले नाही? कोल्हापूरच्या जनतेची ‘ईडी’ चौकशी करण्याची त्यांची योजना चांगली आहे. पाच राज्यांत जेथे जेथे भाजपचा विजय झाला, त्या प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची ‘ईडी’ चौकशी लावाच. गोव्यातील पणजी आणि साखळ मतदारसंघातून सुरुवात करा, म्हणजे सत्य समोर येईल. ” हर हर मोदी, घर घर मोदी” या घोषणेस जोडून कोणी “हर हर ईडी, घर घर ईडी,” अशी घोषणा देत असेल तर लोकांना बंड करावेच लागेल. असा प्रहार शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे डोके सुपीक असल्याचे बोलले जाते. याचा अर्थ महाराष्ट्राची मती व माती वांझ आहे असे नाही. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करायचाच असे या मंडळींनी ठरविलेले दिसते. काँग्रेस आमदाराच्या आकस्मिक निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. लोकशाही मार्गाने निवडणुकीचा जो निकाल लागायचा तो लागेल, पण भाजपच्या प्रांतिक अध्यक्षांनी कोल्हापूरच्या मतदारांना सरळ सरळ धमकावले आहे की, भाजपास मतदान झाले नाही तर तुमच्या मागे ‘ईडी’चा ससेमिरा लावू. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होईल व ते डिजिटल माध्यमातून होईल, अशी भीती भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी राज्यातील संबंधित यंत्रणांना सावध केले पाहिजे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

भारतीय जनता पक्ष हा जणू सोवळे नेसूनच राजकारण करीत असल्याने निवडणुकीत पैसे वाटप, दाबदबाव अशा पापकर्मांची त्यांना लाज वाटते, पण निवडणुकीतील लक्ष्मीपूजनाबाबत व लक्ष्मीदर्शनाबाबत भाजप पुढाऱ्यांची दिलदार वक्तव्ये पाहिल्यावर श्री. चंद्रकांत पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेचे आश्चर्य वाटते. पाटलांच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे पैठण येथे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले व मतदारांना म्हणाले, “निवडणुकीच्या आधी एक दिवस लक्ष्मीदर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली तर तिला परत करू नका, उलट तिचे स्वागत करा!” म्हणजे भाजपला निवडणुकीतील लक्ष्मीदर्शनाचे व लक्ष्मीपूजनाचे वावडे नाही.

भाजप नवहिंदुत्व, संस्कृती व परंपरांचा वापर करूनच निवडणुका जिंकत असतो. पाटील यांनी कोल्हापूरच्या मतदारांना सरळ सरळ केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमकावले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे, “ईडी म्हणजे भाजपचे घरगडी!” हे विधान सत्य करून दाखविणारे वक्तव्य भाजप प्रांताध्यक्षांनी केले आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

“मी डोलकर दर्याचा राजा…”, पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये सचिन तेंडुलकरने धरला मराठी गाण्यावर ठेका

IPL 2022 RR vs RCB : दिनेश कार्तिकनं उठवला राजस्थानचा बाजार..! वानखेडेवर बंगळुरुचा विजय

“ये क्या हो गया? किधर जाऊ भाई में?” जेव्हा धोनीमुळं इशान किशन आला होता गोत्यात!

IPL 2022 RR vs RCB : बटलर-हेटमायरनं पुन्हा मैदान मारलं..! राजस्थानचं बंगळुरूला १७० धावांचं आव्हान

IPL 2022 : बाबो..! RCBच्या बॉलरकडून यशस्वी जयस्वालची दांडी गुल; सीमारेषेपर्यंत उडाल्या बेल्स!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!