🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विविध मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच पोलीस व्यवस्थेस धमक्या द्यायच्या, ही कुठली रीत?,असा सवालही राऊतांनी केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग झाले. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बनवाबनवी करून हे फोन टॅप केले. या फोन टॅपिंगची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना होती. यासंदर्भात फडणवीस यांच्या घरी पोलीस ‘स्टेटमेंट’ घ्यायला गेले तर भाजप नेत्यांनी महाराष्ट्र पेटवायची भाषा सुरू केली.पोलीस व कायद्यालाकाम करू द्यायचे नाही, पोलीस व्यवस्थेस धमक्या द्यायच्या, ही कुठली रीत?.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘फडणवीस यांचे ‘स्टेटमेंट’ पोलिसांनी घेतले म्हणून त्यांचे लोक महाराष्ट्र जाळायची भाषा करतात. पण भीमा-कोरेगाव प्रकरणात दोन दिवस महाराष्ट्र जळत असताना मुख्यमंत्री फडणवीस ती जाळपोळ विझवू शकले नव्हते. ज्यांच्यात आग विझवायची धमक असते त्यांच्याच तोंडी पेटवापेटवीची भाषा शोभते.’ तसेच महाराष्ट्रातले बहुमताचे सरकार पाडता येत नाही म्हणून पेटवापेटवीची भाषा करायची हे निराशा आणि वैफल्याचे लक्षण आहे, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “…हे मन स्थिर असल्याचे लक्षण नाही”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- …अशी विधाने भाजप पुढाऱ्यांच्या तोंडी शोभत नाहीत- संजय राऊत
- रंग पोचवू शकतात डोळ्यांना इजा! जाणून घ्या कशी घ्यायची काळजी….
- “शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी..” – रावसाहेब दानवे
- अलियाच्या गंगूबाई काठियावाडीची क्रेझ आयफेल टॉवरपर्यंत; साडी नेसून महिलांनी केला भन्नाट डान्स!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
