🕒 1 min read
मुंबई: मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन झारखंडकडून त्याचे देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. किशनने देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा स्टार बनला होता. धोनीच्या नेतृत्वाखालील देशांतर्गत क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात किशनसोबत अशी घटना घडली होती, ज्यानंतर तो गोत्यात पडला होता.
गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या शोमध्ये बोलताना किशनने धोनीने (ms dhoni) फिल्ड चेंज वेळी केलेल्या हातवाऱ्यांनी त्याला कसे गर्तेत पाडले हे इशानने (ishan kishan) सांगितले आहे. यासंबंधी सांगताना किशन म्हणाला, “मी विजय हजारे ट्रॉफी सामन्यात थर्ड-मॅनवर फिल्डिंग करत होतो. ओव्हर संपल्यावर धोनीभाईने हाताच्या इशार्याने फिल्ड बदलली. मला कुठे जायचे ते समजतच नव्हते. मी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरला विचारले की मला कुठे जायचे आहे हे कन्फर्म कर. आणि पुन्हा एकदा धोनीभाईने हाताच्या इशाऱ्याने सांगितले मी चकित झालो.”
इशानने यावेळी इतरही गोष्टींबाबत खुलसा केला आहे. ज्यात त्याने सचिन सोबतचा व्हायरल व्हिडिओचा किस्साही सांगितला. सोबतच त्याने ‘मी धोनी काय विचार करत असेल याचा त्याच्या खेळापेक्षा जास्त विचार करतो’ असेही सांगितले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : बाबो..! RCBच्या बॉलरकडून यशस्वी जयस्वालची दांडी गुल; सीमारेषेपर्यंत उडाल्या बेल्स!
- VIDEO : सचिनसमोर इशान किशननं दिली होती शिवी..! मग पुढे काय झालं वाचा
- “गडकरींच्या रूपात दिल्लीत महाराष्ट्र”; रोहित पाटलांचे ट्विट
- दीपिकाने वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्री होण्यासाठी घेतला होता मोठा निर्णय
- IPL 2022 RR vs RCB : फाफ डु प्लेसिसनं जिंकला टॉस; राजस्थानची पहिली बॅटिंग!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
