🕒 1 min read
मुंबई : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्रातील मोदी सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्राने हा निर्णय घेतला असून या मुद्द्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच मोदी -शहांच्या राज्यात हे असे का घडावे? लोकांना भयमुक्त, शांतपणे का जगता येऊ नये? सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर का यावी?, असा सवालही राऊतांनी केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘जे भाजपपुरस्कृत लोक राजकीय विरोधकांना धमक्या देत आहेत, भाजपचा अजेंडा न्यायालयात व केंद्रीय तपास यंत्रणांत रेटून नेत आहेत, त्यांना ‘वाय’ सुरक्षा व्यवस्था पुरविल्याचा डंका वाजवून आणि अशा ‘वाय’वाल्यांची फौज उभी करून देशात भ्रम निर्माण केला जात आहे. हे एक राष्ट्रीय तसेच राजकीय धोरणच दिसते. ‘वाय’ सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्राला विशेष सुरक्षा दलाची निर्मिती करावी लागेल असेच दिसते.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘देशातील वातावरण मोकळे व सुरक्षित राहिलेले नाही. केंद्र सरकारने ऊठसूट ‘वाय’ किंवा ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा जो सपाटा लावला आहे त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे मोदी-शहांच्या काळात मोकळेपणाने जगण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. लोकांना उगाच भय वाटते. हे भय टोकाचे आहे. मात्र भाजपपुरस्कृत भयग्रस्तांना केंद्र सरकार खास सुरक्षा व्यवस्था पुरवीत आहे.’
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : केएल राहुलला मोठा धक्का..! ७.५ कोटींची बोली लागलेला खेळाडू संघाबाहेर झाला अन् सोबतच…
- “त्यांनी लग्न करावं, हनिमून करावं…”; एमआयएमने मविआला दिलेल्या ऑफरवर नितेश राणेंची प्रतिक्रिया
- काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर ‘Me Too’चा आरोप; पहा काय आहे नेमकं प्रकरण..
- चित्रा वाघ आणि संबंधित तरुणीची नार्को टेस्ट करा; कुचिक यांच्या मुलीची मागणी
- “प्रतिज्ञापत्रात दोन लग्न झाल्याचा खुलासा करा…”- चंद्रकांत पाटलांचा धनंजय मुंडेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
