पुणे: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये आयकॉनिक ‘मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा..’ या गाण्यावर ठेका धरताना दिसून आला. याचा व्हिडिओ त्याने स्वतः आपल्या ट्वीटरवर पोस्ट केला आहे. सचिन सोबत किरण मोरेही या व्हिडिओत दिसून येत आहेत.
आज (६ एप्रिल) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे. यासाठी भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज किरण मोरे यांच्यासह कारमधून पुण्याला जात असताना तेंडुलकरने त्याचा व्हिडिओ ट्विट केला. लता मंगेशकर आणि हृदय मंगेश यांनी गायलेलं ‘मी डोलकर दर्याचा राजा’ या मराठी गाण्यावर दोघे ठेका धरताना दिसून आले. ‘पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकलो. हे सुंदर गाणे ऐकण्याचा विचार केला’, असे कॅप्शन सचिनने या व्हिडिओला दिले आहे.
दरम्यान मुंबई इंडियन्सने त्यांच्या आयपीएल 2022 च्या मोहिमेची सुरुवात निराशाजनक पद्धतीने केली. त्यांचा सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाला. आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 RR vs RCB : दिनेश कार्तिकनं उठवला राजस्थानचा बाजार..! वानखेडेवर बंगळुरुचा विजय
“ये क्या हो गया? किधर जाऊ भाई में?” जेव्हा धोनीमुळं इशान किशन आला होता गोत्यात!
IPL 2022 RR vs RCB : बटलर-हेटमायरनं पुन्हा मैदान मारलं..! राजस्थानचं बंगळुरूला १७० धावांचं आव्हान
IPL 2022 : बाबो..! RCBच्या बॉलरकडून यशस्वी जयस्वालची दांडी गुल; सीमारेषेपर्यंत उडाल्या बेल्स!
VIDEO : सचिनसमोर इशान किशननं दिली होती शिवी..! मग पुढे काय झालं वाचा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

