Share

IPL 2022 RR vs RCB : दिनेश कार्तिकनं उठवला राजस्थानचा बाजार..! वानखेडेवर बंगळुरुचा विजय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक आणि शाहबाझ अहमद यांनी केलेल्या झुंजार फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा विजयरथ वानखेडेवर रोखला. बंगळुरूने राजस्थानचा ४ गडी राखून पराभव करत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात आरसीबीचा कप्तान फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज जोस बटलरचे दमदार अर्धशतक आणि हेटमायरच्या नाबाद ४२ धावांच्या खेळीमुळे राजस्थानने बंगळुरूला १७० धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात १०० धावांच्या आत बंगळुरूने आपले पाच फलंदाज गमावले, पण कार्तिकची नाबाद ४४ धावांची खेळी बंगळुरूला विजयाकडे घेऊन गेली. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

बंगळुरूचा डाव

कप्तान फाफ डु प्लेसिस आणि अनुज रावत यांनी बंगळुरूला उत्तम सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ५५ धावा फलकावर लावल्या. राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने डु प्लेसिसला (२९) ट्रेंट बोल्टकरवी झेलबाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. त्यानंतर नवदीप सैनीने रावतला (२६) बाद केले. बंगळुरूचा माजी कप्तान विराट कोहली (५) डेव्हिड विली (०) यांना फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या एकाच षटकात तंबूत परतावे लागले. ८७ धावांत अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर शाहबाझ अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी झटपट धावा केल्या. कार्तिकने अश्विनच्या एकाच षटकात २१ धावा चोपत संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली. अर्धशतकाजवळ पोहोचलेल्या अहमदला बोल्टने १८व्या षटकात तंबूत धाडले. अहमदने २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४५ धावा केल्या. २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बंगळुरूने ४ गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्तिकने २३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. राजस्थानकडून बोल्ट आणि चहलने प्रत्येकी २ बळी घेतले.

राजस्थानचा डाव

जोस बटलरसोबत सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालला राजस्थानला चांगली सुरुवात करून देता आली नाही. आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने यशस्वीचा (४) त्रिफळा उडवला. त्यानंतर विलीने बटलरला तो ११ धावांवर जीवदान दिले. या जीवदानाचा पुरेपूर वापर करत बटलरने देवदत्त पडिक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. देवदत्तने २ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा केल्या. हर्षल पटेलने त्याला विराटकरवी झेलबाद केले. राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनला (८) मोठी खेळी करता आली नाही. लीगमध्ये फॉर्मात खेळणाऱ्या शिमरॉन हेटमायरने बलटरसोबत धावगती वाढवली. १९व्या षटकात बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात बटलर-हेटमायरने २३ धावा वसूल करत संघाला दीडशतकापार नेले. बटलरने ६ षटकारांसह ७० तर हेटमायरने ४ चौकार आणि २ षटकारासह ४२ धावा केल्या. २० षटकात राजस्थानने ३ बाद १६९ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!