🕒 1 min read
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबै बँकेतील फसवणुकीसंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भाजपचे सर्व नेते या फसवणूक प्रकरणी दरेकरांची पाठराखण करीत आहेत याचे आश्चर्य वाटते. लोकसेवक या नात्याने दरेकर यांनी शासनाची, बँकेच्या ठेवीदारांची फसवणूक केल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. यावर भाजप आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला.’
दरम्यान, महाराष्ट्राचे सरकार राजकीय सूडापोटी कारवाया करत असल्याचा गदारोळ या मंडळींनी केला. राजकीय सूडापोटी आपल्यावर कारवाया होत आहेत, अशी विधाने भाजप पुढाऱ्यांच्या तोंडी शोभत नाहीत. गेल्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षाच्या किमान डझनभर पुढाऱ्यांची विविध प्रकरणे उघड झाली. गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान, भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग, फसवणूक अशा प्रकारची ही प्रकरणे आहेत. धक्कादायक असे भूखंड व्यवहार, ठेकेदारी अशीदेखील प्रकरणे आहेत. या प्रकरणांशी दाऊद, छोटा शकील, अबू सालेम यांची नावे जोडली नाहीत म्हणून त्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांचे गांभीर्य कमी होत नाही, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “…हे मन स्थिर असल्याचे लक्षण नाही”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- अधिवेशनानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक मार्ग काढू – शरद पवार
- रंग पोचवू शकतात डोळ्यांना इजा! जाणून घ्या कशी घ्यायची काळजी….
- “शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी..” – रावसाहेब दानवे
- अलियाच्या गंगूबाई काठियावाडीची क्रेझ आयफेल टॉवरपर्यंत; साडी नेसून महिलांनी केला भन्नाट डान्स!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
