🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२मध्ये आज रॉयल सामना म्हणजेच राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात आरसीबीचाकर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जिथे आरसीबीने प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानची दुसऱ्या ओव्हरमध्येच शानदारपणे पहिली विकेट उडवली.
नाणेफेक जिंकल्यानंतर RCBने राजस्थानला (RR) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीला आलेल्या जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल (yashasvi jaiswal) या जोडीने आरामात सुरुवात केली. मात्र दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर डेव्हिड विलीने (david willey) खऱ्या अर्थाने यशस्वी जयस्वालची विकेट उडवली. विलीच्या चेंडूचा वेग इतका होता की स्टंपवर बॉल आदळताच बेल्स अगदी बाऊंड्रीपर्यंत उडाल्या.
राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल ६ चेंडूत अवघ्या ४ धावा करून माघारी परतला. आरसीबीला दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट मिळाल्याने त्यांची सुरुवात चांगली झाली आहे. तसेच विलीच्या धमाकेदार गोलंदाजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मागील सामन्यात अप्रतिम कॅच घेतल्यानंतर या सामन्यातील अशी विकेट घेऊन विलीने क्रिकेट रसिकांना प्रभावित केले आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- VIDEO : सचिनसमोर इशान किशननं दिली होती शिवी..! मग पुढे काय झालं वाचा
- “गडकरींच्या रूपात दिल्लीत महाराष्ट्र”; रोहित पाटलांचे ट्विट
- दीपिकाने वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्री होण्यासाठी घेतला होता मोठा निर्णय
- IPL 2022 RR vs RCB : फाफ डु प्लेसिसनं जिंकला टॉस; राजस्थानची पहिली बॅटिंग!
- भाजप नेते अनिल बोंडेंना तीन महिने कारावासाची शिक्षा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
