मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा कप्तान फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज जोस बटलरचे दमदार अर्धशतक आणि हेटमायरच्या नाबाद ४२ धावांच्या खेळीमुळे राजस्थानने बंगळुरूला १७० धावांचे आव्हान दिले. बटलरला दिलेले जीवदान आरसीबीला महागात पडले.
राजस्थानचा डाव
जोस बटलरसोबत सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालला राजस्थानला चांगली सुरुवात करून देता आली नाही. आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने यशस्वीचा (४) त्रिफळा उडवला. त्यानंतर विलीने बटलरला तो ११ धावांवर जीवदान दिले. या जीवदानाचा पुरेपूर वापर करत बटलरने देवदत्त पडिक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. देवदत्तने २ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावा केल्या. हर्षल पटेलने त्याला विराटकरवी झेलबाद केले. राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनला (८) मोठी खेळी करता आली नाही. लीगमध्ये फॉर्मात खेळणाऱ्या शिमरॉन हेटमायरने बलटरसोबत धावगती वाढवली. १९व्या षटकात बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात बटलर-हेटमायरने २३ धावा वसूल करत संघाला दीडशतकापार नेले. बटलरने ६ षटकारांसह ७० तर हेटमायरने ४ चौकार आणि २ षटकारासह ४२ धावा केल्या. २० षटकात राजस्थानने ३ बाद १६९ धावा केल्या.
दोन्ही संघांची Playing XI
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान ), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रूदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : बाबो..! RCBच्या बॉलरकडून यशस्वी जयस्वालची दांडी गुल; सीमारेषेपर्यंत उडाल्या बेल्स!
- VIDEO : सचिनसमोर इशान किशननं दिली होती शिवी..! मग पुढे काय झालं वाचा
- “गडकरींच्या रूपात दिल्लीत महाराष्ट्र”; रोहित पाटलांचे ट्विट
- दीपिकाने वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्री होण्यासाठी घेतला होता मोठा निर्णय
- IPL 2022 RR vs RCB : फाफ डु प्लेसिसनं जिंकला टॉस; राजस्थानची पहिली बॅटिंग!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

