मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उजाळा दिला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘जातीयता आणि धर्मांधता बाजूला ठेवून राजकारण करता येते हे वाजपेयींनी शिकवले’, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. संजय राऊत शनिवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्ववादी होते, पण ते धर्मांध नव्हते. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, याच भावनेने त्यांनी नेहमी काम केले. त्यामुळे जनता वाजपेयी यांच्याकडे एका पक्षाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा नेता म्हणून पाहत असते. ‘सबका साथ सबका विकास’ हे फक्त त्यांनाच शोभतं, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने लोकप्रिय नेते होते. उत्तम संसदपटू आणि माणुसकी काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
‘हिंदू अब मार नही खाएगा’, असे वाजपेयींनी ठणकावून सांगितले, पण त्याचा अर्थ ‘कोई और मार खाएगा’, असा नव्हता. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, हे सूत्र त्यांनी कसोशीने पाळले. धर्मांध न होतादेखील हिंदुत्वाचे राजकारण करता येते, हे त्यांनी दाखवून दिल्याचे संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.
शिवसेना-भाजपची युतीमध्ये अटल बिहारी वाजपेयींचं योगदान होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनेक निर्णय घेण्यापूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करायचे. आजचा भाजप पाहता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची आठवण येते, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचे माजी क्रिकेटरने केले समर्थन
- “माझ्या अनेक मुद्द्यांना मंत्र्यांनी बगल दिली”, प्रविण दरेकरांचा आरोप
- ‘हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान,समृद्धी,उत्तम आरोग्य,प्रेम आणि अहिंसा घेऊन येवो’
- कोरोनाचे संकट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे, हीच प्रभू येशू यांच्याकडे प्रार्थना- चंद्रकांत पाटील
- नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा क्षण- छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

