🕒 1 min read
मुंबई: कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून विटंबना करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता भाजप नेते संबित पात्रा यांनी (BJP leader Sambit Patra) यांनी मोदी-योगींची तुलना थेट शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याशी केली आहे. यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी संबित पात्रा यांच्यावर टीका केली आहे.
भाजप “संबंधित पात्र” बरळलं, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांची तुलना स्वतःच्या नेत्याशी केली. भाजपचा शिवद्रोह उघडा पडत आहे. कारण धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता लाटणाऱ्यांनो लोक समजून गेलेत “गंगाधर हि शक्तिमान है”. असे ट्वीट करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर टीका केली आहे.
भाजपा "संबंधित पात्र" बरळल, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप याची तुलना स्वतःच्या नेत्याशी केली. भाजपचा #शिवद्रोह उघडा पडत आहे . कारण धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता लाटनारानो लोक समजून गेलेत "गंगाधर हि शक्तिमान है". pic.twitter.com/0TlpQPFAT4
— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 24, 2021
नेमके प्रकरण काय?
एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसींचा (MIM chief Asududdin Owaisi) एक व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औवेसींनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘मी तर त्या पोलीसवाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत, किंवा मोदीच पंतप्रधान बनणार नाहीत. आम्ही मुसलमान वेळ पाहून शांत आहोत, पण आम्ही तुमच्या अत्याचाराला विसणार नाही. अल्लाह.. आपल्या ताकदीने तुम्हाला नेस्तनाबूद करेल आणि आम्ही हेच लक्षात ठेवू. जेव्हा वेळ बदलेल तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल? जेव्हा योगी आपल्या मठात जातील अन् मोदी डोंगरात निघून जातील, तेव्हा कोण येईल? आम्ही तेव्हा विसरणार नाही. हाच व्हिडिओ पोस्ट करत भाजप नेते साबित पात्रा यांनी टीका करत थेट मोदी-योगींची तुलना शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याशी केली आहे.
संबित पात्रा यांचे ‘ते’ ट्वीट-
संबित पात्रा यांनी म्हटले की ,’ कुणाला धमकावत आहात मियां? लक्षात ठेवा जेव्हा-जेव्हा या भूमीवर कूणी औरंगजेब किंवा बाबर येणार तेव्हा तेव्हा मातृभूमीसाठी कूणी शिवाजी, महाराणा प्रताप आणि मोदी-योगी उभे राहणार! ऐका, आम्ही न कधी मुघलांशी घाबरलो न कधी जिन्नावादियांशी मग तुम्हाला काय खाक घाबरणार?’ असे ट्वीट संबित पात्रा यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
