🕒 1 min read
मुंबई: आज जगभरात नाताळाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. तर सामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वच जन नाताळाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही ट्वीट करत समस्त राज्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘नाताळ हा सण आनंदाचे प्रतीक म्हणून आपण साजरा करतो.नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा क्षण,कष्टकरी लोकांचे ओझे हलके करण्याचा सण, रंजल्या-गांजल्यांना दिलासा देण्याचा सण. हा सण भगवान येशूच्या आध्यात्मिक ज्ञानाने ज्योतीने ज्योत पेटवून,दिव्याने दिवा पेटवून संपूर्ण ख्रिस्तमय वातावरणात साजरा करूया नाताळ हा सण स्वच्छता,सुंदरता,शिस्त,शांततेचे प्रतिक आहे. एकमेकांबरोबर स्नेहभाव-बंधुभाव, प्रेम-दया क्षमा शांती निर्माण करण्याची शिकवण येशूने जगाला दिली आहे. त्यांचा हा आदर्श नाताळ सणाच्या निमित्ताने आपण पुढे नेऊया.’ असे ट्वीट छगन भुजबळ यांनी केले आहे.
संपूर्ण ख्रिस्तमय वातावरणात साजरा करूया नाताळ हा सण स्वच्छता,सुंदरता,शिस्त,शांततेचे प्रतिक आहे.एकमेकांबरोबर स्नेहभाव-बंधुभाव, प्रेम-दया क्षमा शांती निर्माण करण्याची शिकवण येशूने जगाला दिली आहे. त्यांचा हा आदर्श नाताळ सणाच्या निमित्ताने आपण पुढे नेऊया.#MerryChristmas
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 25, 2021
दरम्यान राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारपासून राज्याभरात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाताळ सणाच्या सेलिब्रेशनसाठी आधीपासून सरकारनं नियमावली घोषित केली होती. नाताळाचा सण मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने जनतेला केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,’ओळखा पाहू कोण?’
- ‘अजित पवारांना नेहमीच वाटते की, माझा परखडपणा किती मोठा आहे पण..’, चंद्रकांत पाटीलांची टीका
- मोदी-योगींची तुलना थेट शिवाजी महाराज अन् महाराणा प्रतापांसोबत; भाजप नेत्याचा प्रताप
- योगी सरकार देणार १ कोटी युवकांना मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन
- नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी करायला हवे – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
