Share

चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत

Published On: 

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक सल्ले देत आहेत. तसेच या मुद्द्यावरुन भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. याला अनुसरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांची कान टोचली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना संजय राऊत म्हणाले की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत बरी असून त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना काही पथ्य होती. ती पूर्ण झाली आहेत. त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीचा फार गाजावाजा करू नये. माणुसकी दाखवली पाहिजे. पुढच्या तीन चार दिवसात मुख्यमंत्री विरोधी पक्षांना दिसतील. ते सर्व कामकाजांवर लक्ष ठेवून आहे,’ असे राऊत म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले की,’भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांची नजर कमजोर झाली असून त्यांना दिसत नाही, ऐकायला येत नाही. त्यांना मेडिकल हेल्पची गरज आहे, आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काही काळ घरी बसून विश्रांती घ्यावी. काही काळ मुख्यमंत्रिपदाचा भार आदित्य ठाकरे किंवा अजित पवारांकडे सोपवावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!