🕒 1 min read
मुंबई: आज जगभरात नाताळाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. तर सामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वच जन नाताळाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्वीट करत कोरोनाचे संकट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे, अशी प्रार्थना प्रभू येशू यांच्याकडे केली आहे.
‘सर्व भारतीय ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आगामी वर्षात जगावर आलेले हे कोरोनाचे सावट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, हीच प्रभू येशू यांच्याकडे प्रार्थना!’ असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
सर्व भारतीय ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा ! आगामी वर्षात जगावर आलेले हे कोरोनाचे सावट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, हीच प्रभू येशू यांच्याकडे प्रार्थना !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 25, 2021
दरम्यान यावरच राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही ट्वीट करत समस्त राज्याला शुभेच्छा दिल्या आहेत.‘नाताळ हा सण आनंदाचे प्रतीक म्हणून आपण साजरा करतो.नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा क्षण,कष्टकरी लोकांचे ओझे हलके करण्याचा सण, रंजल्या-गांजल्यांना दिलासा देण्याचा सण. हा सण भगवान येशूच्या आध्यात्मिक ज्ञानाने ज्योतीने ज्योत पेटवून,दिव्याने दिवा पेटवून संपूर्ण ख्रिस्तमय वातावरणात साजरा करूया नाताळ हा सण स्वच्छता,सुंदरता,शिस्त,शांततेचे प्रतिक आहे. एकमेकांबरोबर स्नेहभाव-बंधुभाव, प्रेम-दया क्षमा शांती निर्माण करण्याची शिकवण येशूने जगाला दिली आहे. त्यांचा हा आदर्श नाताळ सणाच्या निमित्ताने आपण पुढे नेऊया.’ असे ट्वीट छगन भुजबळ यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा क्षण- छगन भुजबळ
- केंद्राकडून ३१ हजार ६२४ कोटींचा ‘जीएसटी’परतावा बाकी; अजित पवारांची माहिती
- चिंताजनक! देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- हरभजनच्या निवृत्तीनंतर सौरव गांगुलीने दिला जुन्या आठवणींना उजाळा
- विरोधकांच्या सर्व प्रश्नांना अजित पवारांचे उत्तर, वाचा सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
