🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आजच्या(२५ डिसें.)आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नवीन निर्बंधांविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रातही निदान रात्रीचे निर्बंध घालावेत यासाठी हालचाली सुरू आहेत . नाताळ , नवीन वर्ष यांच्या स्वागताच्या जल्लोषी पाटर्य़ा थांबविण्यासाठी सरकारने निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली तरी लोकांची मानसिकता आता बंधने झुगारून उत्सव साजरे करण्याची आहे. नेत्यांच्या , पंतप्रधानांच्या सभा होतात मग आमच्या आनंदावर बंधने का लावता , हा त्यांचा सवाल आहे . कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी ‘ रात्रीस खेळ चाले ‘ चा हा प्रयोग प्रभावी ठरणारा असला तरी दिवसाची गर्दी अनिर्बंध राहिली तर तो फायद्याचा ठरणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे .’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली ही चिंतेची आणि धक्कादायक बाब आहे. मुंबईत मंगळवारी ३२७ रुग्ण, बुधवारी ४९० आणि गुरुवारी ६०२ रुग्ण सापडले. झपाटय़ाने होणारी रुग्णवाढ नक्की कोणत्या दिशेने देशाला घेऊन जाणार आहे ते सांगता येत नाही. कोरोनाबरोबर ‘ओमायक्रोन’चा संसर्ग वाढतो आहे आणि ओमायक्रोनच्या पाठोपाठ डेलमायक्रोनचा धोका दार ठोठावतो आहे. कोरोनाचा रोज नवा ‘अवतार’ निर्माण होत आहे. त्यामुळे जगाच्या आरोग्य व्यवस्थेतील गुंतागुंत वाढू शकेल. महाराष्ट्रात ओमायक्रोनचे नवीन २३ रुग्ण आढळले. कोरोनाचा संसर्ग काहीसा ओसरू लागल्यावर सरकारने निर्बंध हटविले. लोक गाडी-घोडे, रेस्टॉरंट, मॉल्स, नाटक-चित्रपटगृहांत फिरू लागले. लोकल ट्रेन्सच्या दारात नेहमीप्रमाणे प्रवासी लटकू लागले. विमानतळांवर जत्रा भरल्या. देशभरातील ‘खाऊगल्ल्या’ फुल्ल झाल्या. लग्न, समारंभ, पाटर्य़ा ओसंडून वाहू लागल्या व त्याहीपेक्षा ज्या चार-पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत तेथे आपले पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या गर्दीच्या सभा होत आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,‘ओळखा पाहू कोण?’
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
