मुंबई: आज जगभरात नाताळाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वच जन नाताळाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनीही सर्वांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश देणाऱ्या येशूंनी जीवनभर मानव कल्याणासाठी कार्य केले. येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळ सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख,समाधान,समृद्धी, उत्तम आरोग्य,प्रेम, अहिंसा घेऊन येवो. सर्वांना नाताळ निमित्त हार्दिक शुभेच्छा.’
जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश देणाऱ्या येशूंनी जीवनभर मानव कल्याणासाठी कार्य केले. येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळ सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख,समाधान,समृद्धी, उत्तम आरोग्य,प्रेम, अहिंसा घेऊन येवो. सर्वांना नाताळ निमित्त हार्दिक शुभेच्छा!#MerryXmas pic.twitter.com/9UYFuiGXwv
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 25, 2021
दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कालपासून(२४ डिसें.)रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच नाताळ सण साजरा करण्यासाठी अगोदरच सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,‘ओळखा पाहू कोण?’
- ‘रात्रीस खेळ चाले’चा हा प्रयोग प्रभावी ठरणारा असला तरी…- संजय राऊत
- नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी करायला हवे – संजय राऊत
- चिंताजनक! देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य


