Share

‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं- सचिन सावंत

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर केंद्र सरकारनं वर्षभरापूर्वी आणलेले कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर भाजपवर टीकेची झोड उठली असून शेतकऱ्यांच्या लढ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकऱ्यांना सौहार्दाचे व शांततापूर्ण चर्चेचे सल्ले देणाऱ्या सेलिब्रिटींवरही टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी या संदर्भात एक ट्वीट करत सेलिब्रिटींना शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्याचं आवाहन केलं आहे.

साधारण वर्षभरापूर्वी कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर आंदोलन पेटले. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशातील शेतकरी यात आघाडीवर होते. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे दिल्लीत प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरच ठाण मांडलं. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर देशातील नामवंत क्रिकेटपटू, अभिनेत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता.

काही सेलिब्रिटींनी सरकारच्या चर्चेच्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं. तर, काहींनी बाह्य शक्ती आमच्यात फूट पाडू शकत नाहीत, असं म्हणत आंदोलनाला बाहेरून पाठिंबा मिळत असल्याचं अप्रत्यक्षपणे सुचवलं होतं. यातील अनेक सेलिब्रिटींचे एकाच प्रकारचे होते. त्यातील प्रत्येक शब्द एकसारखा होता. त्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका झाली होती. आता मोदी सरकारला माघार घ्यावी लागल्यानंतर हेच सेलिब्रिटी आणि भाजप टीकेच्या रडारवर आला आहे. सचिन सावंत यांनी विराट कोहली, सुरेश रैना, सायना नेहवाल, अक्षय कुमार, अनिल कुंबळे व लता मंगेशकर यांचे ट्वीट सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यातील ‘सौहार्दपूर्ण तोडगा’ या शब्दाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

‘सेलिब्रिटींनी हव्या असलेला सौहार्दपूर्ण तोडगा आता निघाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी न्यायासाठी लढलेल्या लढ्याचं कौतुक करणारे ट्वीट ते करतील अशी अपेक्षा आहे. हे ट्वीट करताना त्यांनी भाजपच्या नेत्यांना वा कार्यकर्त्यांना टॅग केले तरी हरकत नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. ‘भाजपवाल्यांनी पूर्वीप्रमाणे सेलिब्रिटींना ट्वीट लिहून द्यावेत, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!