Share

रत्नागिरीत रोजंदारीवर काम करणाऱ्या ८६ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

Published On: 

रत्नागिरी : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु असून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अशातच राज्य सरकारने कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. प्रशासनाच्या वतीने आत्तापर्यंत रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ८६ कर्मचऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. २४ तासांच्या आत कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. परंतु, तरी देखील कर्मचारी कामावर हजर न झाल्याने ८६ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४ हजार ३३९ इतकी आहे. त्यापैकी २४९ कर्मचारी राज्य परिवहन महामंडळात(State Transport Corporation) रोजंदारीवर काम करतात. सांगून देखील कर्तव्यावर हजर न झाल्याने यातील ८६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र तरी देखील जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कामावर रूजू होणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, आज पुन्हा एकदा रोजंदारीवर काम करणाऱ्या राज्यातील एकूण २३८ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण २७७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामावर रूजू न झाल्यास यापुढेही निलंबन सुरूच राहणार असल्याचा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!