Share

‘असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय’; राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र

Published On: 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीन कृषी कायदे (Farm Law)  मागे घेतले आहेत. काल (१९ नोव्हें.) सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली.

वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना जाहीर पत्र लिहून अभिनंदन केले आहे. येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून याबाबतची संसदीय प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय आहे. गोठवणारी थंडी, कडक ऊन, पाऊस अशा संकटाना गेले वर्षभर तुम्ही तोंड देत तिन्ही शेतीविरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी तुम्ही जो सत्याग्रह जिंकलात, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासात सापडत नाही. या लढ्यात शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाला मी नमन करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

पुढे संघर्ष अजून संपला नसल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले. शेतमाला हमीभाव, वादग्रस्त वीज कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करणे, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरील कराचा बोझा कमी करणे, डिझेलच्या किंमतीमधील अप्रत्यक्ष दर वाढ कमी करा, शेतमजूरांवरील कर्जाचे ओझे कमी करणे आदी मुद्दे आहे. शेतकऱ्यांना आपला नफा-तोटा चांगल्याप्रकारे समजतो. काही मूठभर भांडवलदारांचे बाहुले बनून शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतीत गुलाम करण्याचा कट रचण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!