Share

‘आयपीएल नसती तर कदाचित हर्षल पटेलला भारतीय संघात स्थान मिळाले नसते’

Published On: 

जयपूर : माजी खेळाडू अजय जडेजाने (Ajay Jadeja) भारतीय संघातील नवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षल पटेलने (Harshal Patel)  न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. हर्षल पटेलने 4 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले. त्याच्या जबरदस्त कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पहिल्याच सामन्यात सामनावीर मिळणे ही मोठी गोष्ट आहे.

दरम्यान, हर्षल पटेलला भारतीय संघात स्थान मिळवून देण्यात आयपीएलचे मोठे योगदान असल्याचे अजय जडेजाने म्हटले आहे. त्याच्या मते, जर आयपीएल नसती, तर कदाचित हर्षल पटेलबद्दल कोणी विचारही केला नसता. जर आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर त्याची कामगिरी चांगली झाली आहे. आयपीएल 2021 मध्ये, त्याने 32 विकेट घेतल्या, जे एका हंगामातील कोणत्याही गोलंदाजाची संयुक्त सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे त्याने पर्पल कॅपचा पुरस्कारही जिंकला आणि त्यामुळेच त्याचा आता भारतीय संघातही समावेश करण्यात आला आहे.

अजय जडेजाच्या मते, पुढील विश्वचषकासाठी हर्षल पटेलला सांभाळून ठेवले पाहिजे. त्याच्या मते हर्षलचा जास्त वापर करू नये. क्रिकबझवरील संभाषणादरम्यान, तो म्हणाला, ‘जर आयपीएल नसती तर मला वाटत नाही की लोकांनी हर्षल पटेलला संघात आणा असे म्हटले असते. त्याने आयपीएलमध्ये जे काही केले त्यामुळे अनेकांचे डोळे उघडले असतील. न्यूझीलंडच्या फलंदाजांना माहित होते की ते काय करणार आहेत पण तरीही त्यांना त्यांच्याविरुद्ध धावा करता आल्या नाहीत. भारतीय संघ पुढच्या वर्षी विश्वचषक खेळायला जाईल तेव्हा मला त्यांचा शस्त्रासारखा वापर करायला आवडेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!