मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल(१९ नोव्हें.) सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली.आता यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट(Tweet) करत पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
बैल (Bull)कितना भी अड़ियल क्यों न हो, किसान (Farmer)अपना खेत जुतवा ही लेता है जय जवान जय किसान!! असे खोचक ट्वीट करत संजय राऊत यांनी मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तसेच राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातूनही मोदींवर निशाना साधला आहे.
बैल कितना भी अड़ियल क्यों न हो,
किसान अपना खेत जुतवा ही लेता है।
जय जवान
जय किसान!!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2021
लखीमपूर (Lakhimpur Khiri) खिरी येथे केंद्रीय मंत्रिपुत्राने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी साधा शोकही व्यक्त केला नाही. आज मात्र ‘शेतकरी मरू द्या, आजन्म आंदोलन करू द्या, पण सरकार एक पाऊलही मागे हटणार नाही,’ या आडमुठेपणाचा (Stubbornness) त्याग करून सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यासाठी ५५० शेतकऱ्यांनी बलिदान दिले, दीड वर्ष ऊन-वारा-थंडी-पावसात ते रस्त्यावर लढत राहिले. हे शेतकरी मागे हटणार नाहीत व उत्तर प्रदेश, पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल या भीतीने मोदी सरकारने आता कृषी कायदे मागे घेतले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. देशात मनमानी चालणार नाही, ‘हम करेसो कायदा’ हे तर त्याहून चालणार नाही. अशी भूमिका संजय राऊत यांनी सामनातून मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मानले ‘या’ गायिकेचे आभार
- …पण सरकार एक पाऊलही मागे हटणार नाही- संजय राऊत
- ‘या’ कारणामुळे ऋषभ पंतच्या जर्सीवर लावली होती चिकटपट्टी
- व्वा! काय हा ‘मास्टर स्ट्रोक’, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेचा हल्लाबोल


