रायगड: मोदी सरकारनिर्मीत कृत्रीम महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रायगड येथे जनजागरण अभियान (Janajagaran agitation)राबवण्यात आले. पोलादपूर तालुका काँग्रेसच्या वतीने पोलादपूर येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या उपस्थितीत हे अभियान राबवण्यात आले.
यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा व आढावा बैठक घेण्यात आली. तसेच आगामी जिल्हा परिषद,(Zilla Parishad)पंचायत समिती,नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकानं संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी भारतीय स्वातंत्र्या विषयी कंगना राणावत हिने केलेल्या विधानाचा जाहीर निषेधही करण्यात आला. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त केली या विरोधातच कॉंग्रेसने निषेध करत जनजागरण अभियान राबविले.याबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्वीटरवर(tweet) माहिती देण्यात आली आहे.
मोदी सरकारनिर्मीत कृत्रीम महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने #जन_जागरण_अभियान राबवण्यात येत असून आज रायगड मध्ये पोलादपूर तालुका काँग्रेसच्या वतीने पोलादपूर येथे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री नामदार श्री विजयजी वडेट्टीवार pic.twitter.com/ub67qwtuRZ
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 20, 2021
महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. याविरोधातच पोलादपूर (poladpur)शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. मंत्री वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारचा यावेळी निषेध केला.
महत्वाच्या बातम्या:
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मानले ‘या’ गायिकेचे आभार
- ‘नाना पाटोलेंचे मानसिक संतुलन बिघडले’
- पेन्शन पासून वंचित पात्र स्वातंत्र्य सैनिकांना न्याय द्या; सामाजिक संघटनांचे ठाकरे सरकारला साकडे!
- कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने; चंद्रकांत पाटलांची खंत


