Share

IND vs SA 2022 : भारताचा आठवा टी-२० कर्णधार ठरला ऋषभ पंत; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी ऋषभ पंतला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. यापूर्वी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वी केएल राहुलला दुखापत झाल्याने तो मालिकेबाहेर पडला. त्यामुळे पंतकडे संघाची जबाबदारी देण्यात आली. ऋषभ पंत आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा ८वा कर्णधार ठरणार आहे. पंतच्या आधी सात खेळाडूंनी अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून कर्णधारपदात पदार्पण करणार आहे. त्याच्या अगोदर वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा (संघाचा नियमित कर्णधार), शिखर धवन यांनी भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व केले आहे. सेहवागने भारतासाठी १ सामना, धोनीने ७२ सामने, रैनाचे ३ सामने, रहाणेचे २ सामने, विराट कोहलीने ५० सामने, धवनचे ३ सामने आणि संघाचा सध्याचा कर्णधार असलेला रोहित शर्माने भारतीय संघासाठी २८ सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत.

भारतासाठी टी-२० कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे, त्याने ४६ धावांची खेळी खेळली होती. तर वीरेंद्र सेहवाग ३४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३३ धावा केल्या होत्या. रहाणेनेही ३३ धावा केल्या होत्या. कोहलीने २९ तर रोहित शर्माने १७ धावा केल्या. आता ऋषभ पंत कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात किती धावा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यांमध्ये भारतीय कर्णधाराची धावसंख्या-

वीरेंद्र सेहवाग – ३४
एमएस धोनी – ३३
सुरेश रैना – २८
अजिंक्य रहाणे – 33
विराट कोहली – २९
रोहित शर्मा – १७
शिखर धवन – ४६

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!