Share

IND vs SA 2022 : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली ‘अशी’ असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्माच्या जागी केएल राहुलची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. दिल्लीतील सामन्याच्या एक दिवस आधी त्याला दुखापत झाल्याने तो मालिकेबाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद आता ऋषभ पंतकडे सोपवण्यात आले आहे. ऋषभ पंत कर्णधार झाल्यानंतर हार्दिक पंड्याला संघाचा उपकर्णधार करण्यात आले आहे. ऋषभ पंत पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. साहजिकच संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्याच्यावर दबाव असणार आहे. भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल. कारण दक्षिण आफ्रिका पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे.

केएल राहुलच्या दुखापतीनंतर इशान किशन आणि रुतुराज गायकवाड भारतासाठी डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल, तर कर्णधार ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी करताना दिसू शकतो. ऋषभ पंत संघाच्या गरजेनुसार फलंदाजी क्रम बदलू शकतो असे म्हटले आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. आयपीएल २०२२ मध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारा दिनेश कार्तिक संघात फिनिशर म्हणून भूमिका पार पाडताना दिसेल. तो सहाव्या स्थानावर फलंदाजी करू शकतो. वेंकटेश अय्यर सातव्या क्रमांकावर असू शकतो, जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल देखील या क्रमांकासाठी दावेदार आहे.

भुवनेश्वर कुमार या संघात वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याला साथ देण्यासाठी हर्षल पटेल आणि आवेश खान असतील. या दोघांची कामगिरी आयपीएल २०२२ मध्येही प्रभावी ठरली आहे. संघात एक फिरकी गोलंदाज म्हणून युझवेंद्र चहल असेल जो आयपीएल २०२२ मध्ये पर्पल कॅप विजेता होता. त्याने सर्वाधिक बळी मिळवले होते. उमरान मलिकला या सामन्यात संधी मिळू शकत नाही. कारण प्रशिक्षक द्रविडने आधीच सूचित केले आहे की त्याच्याकडे बरेच पर्याय आहेत. त्यामुळे उमरान तरुण आहे आणि अजून तो शिकत असल्याने प्रत्येकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणे शक्य होणार नाही.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत – इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, व्यंकटेश अय्यर/अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र सिंग चहल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!