मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. काही वर्षांपासून दयाबेन शोमधून गायब होती पण आता शोच्या नवीन प्रोमोमध्ये दयाबेन परतणार असल्याचे दाखवले जात आहे. प्रोमो शेअर होताच सोशल मिडीयावर अनेक चर्चा चालू आहेत. दयाबेन परतल्याची बातमी ऐकून सर्वांनाच आनंद झाला. मात्र आता चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा अलीकडील भाग पाहून दयाबेन शोमध्ये परत येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये, सुंदरलाल जेठालालला वचन देतो की तो दयाबेनला कोणत्याही प्रकारे मुंबईत आणेल. पण नंतर त्यांनी ते वचन उत्साहात दिल्याचे दिसून येते, पण तसे काही होणार नाही. हा एपिसोड पाहिल्यानंतर दयाबेन येणार नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे चाहते पुन्हा एकदा निराश झाले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी याआधीच शो सोडला आहे. गुरचरण सिंग, मोनिका भदौरिया, नेहा मेहता या सर्व कलाकारांनी मालिका आधीच सोडली आहे. सगळ्यात पहिल्यांदा टप्पुची भूमिका भव्य गांधीनी साकारली होती. त्याने देखील हा शो सोडला आहे.
महत्वाच्या बातम्या :


