Share

वसंत मोरेंची ‘पॉवर गेम’, राज ठाकरेंची घेतली भेट ; नाराज निलेश माझिरे पुन्हा पक्षात!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मागील अनेक महिन्यांपासून पुणे मनसेतील नाराजी हा चर्चेचा विषय होता. पुण्यातील अंतर्गत गटबाजी नेहमी चर्चेचा विषय बनत होती. मनसेचे नेते व माजी शहराध्यक्ष वसंत मोरेआणि इतर पदाधिकारी यांच्यातील वाद उफाळून आला होता. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भोंग्यावरील भूमिकेवर विसंगत असा वेगळा सूर आवळला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली होती. यानंतरही वसंत मोरे आणि त्यांच्या निकटवर्तीय समर्थकांची वारंवार कोंडी करण्यात येत असल्याचं समोर येत होतं.

दोनच दिवसांपूर्वी वसंत मोरे यांचे खंदा समर्थक असणारे निलेश माझिरे यांनी पक्षातील नेत्यांच्या गटबाजीला वैतागून पक्षाला राजीनामा दिला होता. पुण्यातील मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळे आरोप लावले. निलेश माझिरे यांनी म्हटलं होतं की, ‘पुण्यातील कोअर कमिटीच्या हुकुमशाहीला कंटाळून मी पक्ष सोडत आहे. पक्षासाठी रात्र न पाहता काम करत राहिलो. अंगावर गुन्हे घेतले त्याचे फळ काय तर पदावरून पायउतार व्हावं लागलं. जिल्हाध्यक्ष पद थांबवले. याला पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि बाबू वागस्कर जबाबदार आहेत. असेच राहिले तर पक्ष तळाशी गेल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं होते.

https://www.facebook.com/vasantmore88/posts/pfbid0QV8xwQCLboa5adk9RwhxWzwWi31Hxqu6YpbUqaDNoUY78MMzRmzYwKtHENWsDJACl

यानंतर मात्र निलेश माझिरे आणि वसंत मोरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत वसंत मोरे आणि माझिरे यांनी राज ठाकरेंशी दीर्घ चर्चा केली. चर्चेनंतर निलेश माझिरे यांची नाराजी दूर झाली आहे. राज ठाकरेंनी निलेश माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा निवड केल्याचं पत्र स्वहस्ते त्यांना दिले.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!