औरंगाबाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. याच मैदानात गेल्या महिन्यात राज ठाकरेंनी गर्जना केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या या सभेकडे लागल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीतील पेचबाबत उद्धव ठाकरे भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लक्ष्य करू शकतात, असे मानले जात आहे. या सभेत बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली.
“लोकसभा निवडणुकीत एकदा अर्जून बाणाने रावसाहेब दानवे यांचा राजकीय वध करू द्या. एक संधी द्या. त्या संधीचं सोनं केलं नाही, तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही”, अशी विनंती अब्दुल सत्तार यांनी अर्जून खोतकर आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती केली.
सभेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेत होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सभेसाठी दीड हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाच डीसीपी, 7 एसीपी, 30 पोलिस निरीक्षक, 100 पोलिस उपनिरीक्षक आणि 1200 पोलिस असतील. त्याचबरोबर एसआरपीएफच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या देखरेखीखाली हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :


